एक ब्रहाचारी गाढवा झ
3351.
एक ब्रहाचारी गाढवा झोबता । हाणोनिया लाता पळाले ते ॥१॥
गाढवही गेले ब्रहाचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाझी ॥धृ॥.
हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायांची ते ॥२॥
अर्थ :
एक ब्रम्हचारी मनुष्य अतिशय कामातूर झाला व सर्व लाज सोडून तो गाढवाला झोंबू लागला मग त्या गाढवाने त्याला लाथा हाणल्या व तेथून पळून गेले. अशा प्रकारे ते गाढवही गेले ब्रम्हचारी मनुष्याचे ब्रम्हचार्यपणही गेले आणि जगामध्ये त्याचे तोंड काळे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, अगदी अशाच प्रकारे मुर्ख मनुष्य स्वार्थही करुन घेत नाहीत आणि परमार्थही करुन घेत नाही ते देखील असेच वायाला जातात.
