जोडिले अंजुळ । असे द
3324.
जोडिले अंजुळ । असे दान उताविळ ॥१॥
पाहा पाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥धृपद॥
तू स्वामी मी सेवक । आइक्य तो एका एक ॥२॥
करितो विनंती । तुका सन्मुख पुढती ॥३॥
अर्थ :
देवा मी माझे अंजूळ म्हणजे दोन्ही हात जोडले आहे आणि तुझ्याकडून दान घेण्यासाठी उतावीळ झालो आहे. त्यामुळे देवा तुम्ही माझ्याकडे कृपा दृष्टीने पाहा, एकदा पाहा आणि तुमच्या कृपादानाचा अनुभव मला घेऊ दयावे. देवा तू स्वामी आणि मी सेवक नेहमी असे असावे अशीच ऐक्यता आपल्या दोघाची असावी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्यापुढे उभा राहून एवढीच विनंती करीत आहे.
