आमुची मिरासी पंढरी ।
3357.
आमुची मिरासी पंढरी । आमुचे घर भीमातिरी ॥१॥
पांडुरंग आमुचा पिता । रखुमाई आमुचि माता ॥धृपद॥
भाउ पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥२॥
तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायापाशी ॥३॥
अर्थ :
आमची वतनदारी म्हणजे पंढरी आहे आणि आमचे घर भीमा नदीच्या तीरावर आहे. पाडूरंग हा आमचा पिता आहे आणि रुक्माई ही आमची माता आहे. पुंडलिक मुनी हा आमचा भाऊ आहे चंद्रभागा ही आमची बहीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी जुना वतनदार आहे त्यामुळे मला पाडूरंगाने त्याच्या पायाजवळ मला आश्रय दिला आहे.
