वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

संदेह गमला । कैसा रे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080693 · अभंग क्र. ३३५९

3359.
संदेह गमला । कैसा रेडा बोलविला ॥१॥
सांगा देव का न होती । निर्जिव चालविली भिंती ॥धृपद॥
कोरडे कागद । उदकी न लागती बुंद ॥२॥
नीळा म्हणे खरा । देवा संतपायी थारा ॥३॥

अर्थ :
ज्ञानोबारायांनी रेड्याला कसे बोलायला लावले या गोष्टीचे आश्चर्य वाटते. निर्जीव भिंतीला देखील ज्ञानेश्वरांनी चालविले मग सांगा ते देव कसे होणार नाहीत ( याचा अर्थ ज्ञानोबाराय देवच आहेत). सद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग रूपी गाथा पाण्यामध्ये लोकांनी टाकला तर त्या गाथेला एक थेंब देखील पाणी लागले नाही संपुर्ण गाथेतील कागद कोरडे निघाले. निळोबाराय म्हणतात अशा श्रेष्ठ संतांच्या ठिकाणीच देवा मला थारा म्हणजे ठाव मिळावा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग