मागता कवतुक । दीन हो
3359.
मागता कवतुक । दीन होऊनी रंक । दारोदारीं भीक । मागे धांवे ॥१॥
मग ते करी काय । पाठी देउनी पाय । रसातळीं पाहे । घालूं धावें ॥२॥
मागो जाता पुढे । मायेचें काढी मढें । उकसाबुकसी रडे । माये माये म्हणोनी ॥३॥
फ़रश घेउनी करी । ज्यातें त्याते मारी । रक्तें रक्त उरी । परि देणे नाही ॥४॥
मागतां रोकडें । एका जनार्दनी सांकडें । मेळवोनि माकडें । पाठी लागे ॥५॥
