वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

वैकुंठीचा देव आणिला

🙏 3. संत तुकाराम · ABH-080901 · अभंग क्र. ३३४९

3349.
वैकुंठीचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥
धारीष्ट धैर्‍याचा वरीष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥धृपद॥
पितृसेवा पुण्ये लाधला निधान । ब्रम्ह सनातन अंगसंगे ॥२॥
अंगसंगे रंगे क्रीडा करी जाणा । ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा ॥३॥
धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याति । तुका म्हणे मुक्ति पायी लोळे ॥४॥

अर्थ :
वैकुंठीचा देव ज्याने भूतळावर नामरुपाला आणला असा तो सर्वांपेक्षा वेगळा पुंडलिक धन्य आहे. धैयाचेही धारिष्ट, सर्व भक्तांमध्ये वरिष्ठ, पवित्र, पुण्यवान असा एकनिष्ठ पुंडलिक आहे. या पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली व त्या सेवेच्याच पुण्याईने परब्रम्ह त्याच्या हाती आले ते परब्रम्ह ‘विठ्ठल’ निदान त्यांना सापडले आणि नेहमी त्याच्या संगतीमध्येच ते ब्रम्ह राहिले. अहो ज्याच्या घरामध्ये वैकुंठीचा पाहुणा राहतो ज्याबरोबर राहतो आणि त्याच्या घरामध्ये क्रिडा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या पुंडलिकाची भक्ती आणि शक्ती हे धन्य आहे आणि त्याच्या भक्ती व शक्तीची ख्याती त्रैलोक्यात प्रसिध्द आहे पुंडलिकाच्या पायाजवळ तर चारही मुक्ती लोळण घेत आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग