वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

एकी असे हेवा । येर अ

🙏 3. संत तुकाराम · ABH-080545 · अभंग क्र. ३३१९

3319.
एकी असे हेवा । येर अनावडी जीवा ॥१॥
देवे केल्या भिन्नजाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥धृपद॥
प्रीतिसाठी भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥२॥
तुका म्हणे लळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥३॥

अर्थ :
एखादा हरीच्या स्वरुपाशी एकरुप झालेला असतो तर एखादयाला त्याची आवड असते तर काही जीवांना त्याची आवडच नसते. याचे मुख्य कारण म्हणजे देवाने तीन प्रकारच्या जाती निर्माण केल्या आहेत उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. आपआपल्या आवडीमुळेच भेद निर्माण होतात त्यामुळे कोणी पूज्य तर कोणी निद्य वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या अंत:करणामध्ये ज्या विषयाबद्दल प्रेम कळवळा असेल त्याविषयी तो लळा धरुन तो विषय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु शकतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग