मागतां पै कैवाडे । ल
3361.
मागतां पै कैवाडे । लुंची लागे मुंडे । नागवा होऊनी पुढे । उभा ठाके ॥१॥
मागतां फ़ाडोवाडे । घाऊनियां घोडा चढे । स्वर्ग घेऊनि वाढे । करी मारामारी ॥२॥
कलंकी होऊनि पुढे ऋणामाजीं बुडे । कलीच्या अंती घडे । कर्म ऎसे ॥३॥
मागतां दाटोदाटी । नवल त्याची गोठी । लाविली लंगोटी । एका जनार्दनी नारदासी ॥४॥
