वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

स्वामीचे हे देणे । य

🙏 3. संत तुकाराम · ABH-080620 · अभंग क्र. ३३२०

3320.
स्वामीचे हे देणे । येथे पावलो दर्षणे ॥१॥
करू आवडीने वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥धृपद॥
कळावया वर्म । हा तो पायाचाचि धर्म ॥२॥
तुका म्हणे सिद्धी । हेचि पावविली बुद्धी ॥३॥

अर्थ :
मला मुक्त स्थिती प्राप्त झाली हे माझ्या स्वामीचे कृपेचीच देणगी आहे. देवा आता आम्ही तुमच्याशी आवडीने प्रेमाने वाद संवाद करु आणि तुमच्या सुखाविषयी आम्ही सारे वैष्णव चर्चा करु. देवा तुमच्या पायाची सेवा करणे तुमच्या पायाचे दर्शन घेणे हेच तुमच्या प्राप्तीचे खरे वर्म आहे हे आता आम्हाला समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी बुध्दी तुमच्या पायाच्या ठिकाणी एकनिष्ठ राहिली त्यामुळे मला तुमची प्राप्ती झाली आहे आणि ही सर्व तुमचीच कृपा आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग