वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

न लाहिजे जपे न लाहिज

🙏 3. संत तुकाराम · ABH-080425 · अभंग क्र. ३३१६

3316.
न लाहिजे जपे न लाहिजे तपे । आम्हासी हे सोपे गीती गाता ॥१॥
न करिता ध्यान न करिता धारणा । तो नाचे कीर्त्तनामाजी हरी ॥धृपद॥
जयासी नाही रूप आणि आकार । तोचि कटी कर उभा विटे ॥२॥
अनंत ब्रम्हांडे जयाचिया पोटी । तो आम्हा संपुष्टी भक्तीभावे ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणती लडिवाळे । जी होती निर्मळे अंतर्बाही ॥४॥

अर्थ :
जो देव जपाने व तपाने साध्य होत नाही असा देव नामरुपी त्याचे गीत गायिले त्यामुळे आम्हाला सोपा झाला आहे. या हरीचे कोणत्याही प्रकारचे ध्यान केले नाही धारणा केले नाही तरी देखील तो केवळ नाम घेतले यामुळे आमच्या किर्तनामध्ये प्रेमाने नाचतो. ज्याला रुप नाही आकार नाही तो कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे. ज्या हरीच्या पोटामधे अनंत ब्रम्हांड आहेत असा हरी आम्ही भक्तीभावाच्या बळावर आमच्या ह्दयरुपी संपुटामध्ये साठवून ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे हरीचे लाडके भक्त आहेत व आतरबाह्य निर्मळ आहेत तेच हरीच्या प्राप्तीचे खरे वर्म जाणतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग