मना नको नको हिंडों द
3316.
मना नको नको हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी येता जाता ॥१॥
कल्पना सोडोनि संतासंगें राहे । सर्व सुख आहे त्यांचे पायी ॥२॥
ज्याचिया दरुशने शोक मोह जळे । पाप ताप पळे काळभय ॥३॥
जवळीच दिसे भावितां भाविता । एका जनार्दनी ध्याता सुख मोठे ॥४॥
