वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

भक्त भागवत जीवन्मुक्

🙏 3. संत तुकाराम · ABH-080728 · अभंग क्र. ३३५५

3355.
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं।
ऐसिया अनंतामाजी तू अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥१॥
ब्रह्मानंद तुके तुळे आला तुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनी ॥धृपद॥
शास्र शीष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविनी योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळी जग दांध्या गिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
संत वृंदे तीर्थ गौतमी हरीकथा । तुकया नर सिंहस्ता भेटो आली ॥३॥
शांति पतिव्रते झाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता।
क्षमा क्षमापणे प्रसिद्ध प्रथा जगी । ते तो तुझ्या अंगी मूर्तीमंत ॥४॥
दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वी विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभावे ॥५॥
अधर्म क्षयव्याधि धर्मांशी स्पर्शला । तो त्वा उपचारिला अनन्यभक्ती।
ब्रम्ह ऐक्यभावे भक्ती विस्तारिली । वाक्ये सफल केली वेदविहिते ॥६॥
देहबुद्धी जात्या अभिमाने वंचलो । तो मी उपेक्षिलो न पाहिजे।
न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥

अर्थ :
भागवत भक्त संत हे जीवनमुक्त आहेत त्यांचा चराचरामध्ये अद्भुत महिमा आहे. अशाच अनंत भक्तांपैकी तू एक अनंत भक्त आहेस जो केवळ लीला करण्याकरता देह धारण करून जगत्राता म्हणजे जगाचे रक्षण करत आहेस. (असे जगद्गुरु तुकाराम महाराजांना श्री रामेश्वर भट्ट म्हणताहेत). ब्रह्मानंदाच्या तूलनेत तुकाराम महाराज उतरले आहेत आणि संपूर्ण विश्वाचा सखा असा हरी तुकाराम महाराजांच्या रूपानेच या भुतलावर क्रिडा करत आहे. हे भक्तराया तुकोबा त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग