वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

मायबापे जरी सर्पीण क

🙏 3. संत तुकाराम · ABH-080450 · अभंग क्र. ३३३१

3331.
मायबापे जरी सर्पीण कि बोका । त्यांचे संगे सुखा न पवे बाळ ॥१॥
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकी घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥

अर्थ :
मायबाप सर्पिंन आणि बोक्याप्रमाने असतील तर मुलाला त्यांच्या सहवासात सुख वाटत नाही. चंदन लाकडाचा सुळ असला तरी जीव घेणार आणि सोन्याची बेड़ी असली तरी पायाना ती दुःखदायक भासनार. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा मनुष्य ज्ञानी असेल आणि त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, अहंकार असेल तर तो नरकातच जाणार.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग