आमची गोसावी आयचित वृ
3337.
आमची गोसावी आयचित वृत्ती । करवी शिष्या हाती उपदेश ॥१॥
दगडाची नांव आधींच ते जड । ते काय दगड तारू जाणे ॥१॥
तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंग संपादणी करिती परी ॥३॥
अर्थ :
काही गोसावी आपली अयाचित (दान घेण्याची) वृत्ती स्वत: न सांगता शिष्याकडून सांगतात. दगडाचि जड नांव इतर दगडांना पैलतीरावर नेउ शकणार नाही; कारण ती स्वतः पाण्यात तरंगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, साधुचा वेश परिधान करण्याचे सोंग करुण त्यांनी साधुत्व विटंबिले आहे
