लागपाठ केला । आता वा
3318.
लागपाठ केला । आता वाटा निट त्याला ॥१॥
करा जोडीचा हव्यास । आले दुरील घरास ॥धृपद॥
फोडिली भांडारे । मोहोरली एकसरे ॥२॥
अवघिया पुरते । तुका म्हणे घ्यावे हाते ॥३॥
अर्थ :
मी परमार्थाचा लागपाठ केला आहे आणि ज्याने कोणी परमार्थाचा लागपाठ केला त्यालाच परमार्थाच्या सरळ वाटा प्राप्त होतील. दूर असलेले निर्गुण निराकार देवाचे स्वरुप स्वत:हून आपल्या घरी म्हणजे पंढरीत आले आहे त्याच्या प्राप्तीचा हव्यास करा. आम्ही परमार्थरुपी धनाचे भांडार फोडले आहे आणि जे भक्तजण आहेत ते हे धन लुटण्यासाठी पुढे आले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे परमार्थरुपी धन तुम्हाला लागेल तेवढे आहे सर्वांना पुरुन ते मागे उरेल एवढे आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे लागेल तेवढे हे परमार्थरुपी धन तुम्ही घ्यावे.
