वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

हे तो वाटले आश्चर्य

🙏 3. संत तुकाराम · ABH-080666 · अभंग क्र. ३३२२

3322.
हे तो वाटले आश्चर्य । तुम्हा न धरवला धीर ॥१॥
माझा फुटतसे प्राण । धाव धाव म्हणऊन ॥धृपद॥
काय नेणो दिशा । झाल्या तुम्हाविण वोसा ॥२॥
तुका म्हणे का गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥

अर्थ :
देवा मी तुम्हाला इतकी करुणा भाकली तरी देखील तुम्ही इतका धीर धरला या गोष्टीचे मला खरोखर आश्चर्य वाटत आहे. अहो देवा माझी मदत करण्यासाठी मी तुम्हाला हाक मारतोय धावा असे मी तुम्हाला म्हणतोय तरी देखील तुम्ही माझ्या मदतीला येत नाही तुम्हाला आळवताना माझा प्राण फुटत आहे. अहो देवा मग तुमच्यावाचून सर्व दिशा ओस पडल्या आहेत की काय ही गोष्ट मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा मी तुम्हाला करुणा भाकतो तरी देखील तुम्ही का ऐकत नाहीत ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग