वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

गंगा गेली सिंधुपाशी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080749 · अभंग क्र. ३३५८

3358.
गंगा गेली सिंधुपाशी । जरी तो ठाव नेदी तिशी ॥१॥
तिणे जावे कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥धृपद॥
जळ क्षोभले जलचरा । माता बाळा नेदी थारा ॥२॥
तुका म्हणे आलो शरण । देवा त्वा का धरिले मौन ॥३॥

अर्थ :
गंगा समुद्राजवळ गेली आणि समुद्राने तिला तेथे स्थानच दिले नाही तर, मग तिने कोठे जावे हे पंढरीराया आता तुम्हीच हे मला सांगा ? पाणी जळचरांवर चिडले आणि मातेने बाळाला थाराच दिला नाही तर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुम्हाला शरण आलो आता तुमच्यावाचून मी दुसरे कोठे जावे मी तुमच्याजवळ आलो आणि तुम्ही असे मौन का धरले आहे देवा सांगा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग