मना ऐक एक मात । धरी
3331.
मना ऐक एक मात । धरी हरिनामीं हेत ॥१॥
तेणे चुकती बंधन । वाचे म्हणे नारायण ॥२॥
नारायण नाम । तेणे सर्व होय काम ॥३॥
दृढ धरी भाव । न करी आणिक उपाव ॥४॥
उपाव न करी कांही । शरण देवासी तू जाई ॥५॥
एका जनार्दनी मन । करी देवासी अर्पण ॥६॥
