धावा केला धावा । श्र
3323.
धावा केला धावा । श्रम होऊ नेदी जीवा ॥१॥
वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेंकुरा ॥धृपद॥
उशीर तो आता । न करावा हेचि चिंता ॥२॥
तुका म्हणे त्वरे । वेग करी विश्वंभरे ॥३॥
अर्थ :
देवा मी तुमचा धावा केला आहे त्यामुळे आता लवकर धावत या माझ्या जीवाला जास्त त्रास होऊ देऊ नका. देवा माझ्यावर प्रेम अमृताचा वर्षाव करा आणि मला लेकराला तुमच्या कडेवर घेऊन मिठी मारा. देवा तुम्ही उशीर करता काय याविषयी मला चिंता वाटत आहे परंतू आता तुम्ही उशीर करु नका लवकर तुम्ही यावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विश्वंभरे मला भेट देण्यासाठी तुम्ही त्वरा करा घाई करा.
