रुसलो संसारा । आम्ही
3321.
रुसलो संसारा । आम्ही आप आणि परा ॥१॥
म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलो मुरकंडी ॥धृपद॥
परतेचि ना मागे । मोहो निष्ठुर झालो अंगे ॥२॥
सापडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥३॥
अर्थ :
आम्ही स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या संसारावर आता रुसलो आहोत. म्हणूनच मी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे व एका बाजूला मुरकूंडी देऊन पडलो आहे. मी मोहाने परत संसाराकडे मागे कधीही फिरणार नाही इतका मी सर्वांगाने निष्ठूर झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला देव सापडला त्यामुळे आमचे सर्व भेव गेले आहे.
