लटकीयाची आण । लटिकें
3357.
लटकीयाची आण । लटिकेंचि प्रमाण । ऎसीयासी कोण । विश्वासेल ॥१॥
मागतां बळे बळी । उदकी देत चळी । अतिशय तळमळी । मीन जैसा ॥२॥
मागतां मांसा मासा । मुरुडू धांवे घसा । डावेनी हातें कैसा । शंख करी ॥३॥
अतिशय कृपण । शरण एका जनार्दन । बाळा दे स्तनपान । पिलीं पोसी ॥४॥
