वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

ऐसे तीर्थ कोणी दाखवा

🙏 4. संत नामदेव · ABH-082969 · अभंग क्र. ४०७

407.
ऐसे तीर्थ कोणी दाखवा गोमटें|जेथे प्रत्यक्ष भेटे परब्रह्म॥१॥
कोठे ऐसे क्षेत्र आहे त्रिभुवनींसकळा शिरोमणि चंद्रभागा॥२॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवावें|देखतांचि सुख पावे मन॥३॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवा साजिरें|सदा प्रेमपुरे वोसंडत॥४॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ|जेथे समारंभ हरिकथेचा॥५॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवा निर्मळ|परब्रह्म केवळ सकळा जीवा॥६|नामा म्हणे आम्हा दीनांचे माहेर|धन्य पंढरपूर गीती गातां॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग