वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 3. ईतर संतांच्या आरत्या

श्रीस्वामीसमर्थ आरती

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073045 · अभंग क्र. ४१५

415.

श्रीस्वामीसमर्थ आरती

जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था । आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा ॥धृ॥
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी । जगदुद्धारासाठी राया तू फिरसी ।
भक्तवत्सल खरा तू एक होसी । म्हणुनि शरण आलो तुझे चरणासी ॥१॥
ञैगुणपरब्रम्ह तूझा अवतार । त्याची काय वर्णू लीला पामर ।
शेषादिक शिणले । नलगे त्या पार । तेथे जडमूढ कैसा करु मी विस्तार ॥२॥
देवादीदेव तू स्वामीराया । निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया ।
तुजसी अर्पण केली आपुली ही काया । शरणागता तारी तू स्वामीराया ॥३॥
अघटित लीला करूनी जडमूढ उद्धरिले । कीर्ती ऐकुनि कानी चरणी मी लोळे ।
चरण-प्रसाद मोठा मज हे अनुभवले । तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग