उभा ठेला इटेवरी ।
408.
उभा ठेला इटेवरी ।
प्रभा दाटली अंबरी ॥१॥
विठो कैवल्याचा गाभा ।
व्यापुनिया ठेला नभा ॥२॥
नेणती कुसरी ।
ब्रम्हादिक ज्याची थोरी ॥३॥
निळा म्हणे भक्तिसुखा ।
भुलोनिया आला देखा ॥४॥
408.
उभा ठेला इटेवरी ।
प्रभा दाटली अंबरी ॥१॥
विठो कैवल्याचा गाभा ।
व्यापुनिया ठेला नभा ॥२॥
नेणती कुसरी ।
ब्रम्हादिक ज्याची थोरी ॥३॥
निळा म्हणे भक्तिसुखा ।
भुलोनिया आला देखा ॥४॥