पापाची वस्ती जाणा ।
403.
पापाची वस्ती जाणा । पंढरीसी नाही कोण्हा ॥१॥
अवघे भाग्याचे सदैव । तेथे वसे विठ्ठल देव ॥२॥
माहेर भाविका । देखिलीया पुंडलिका ॥३॥
जनार्दनाचा एका म्हणे । पंढरी पेणे सुखवस्ती ॥४॥