वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तीर्था तीर्थाराव ती

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076149 · अभंग क्र. ४१३

413.
तीर्था तीर्थाराव ती एक पंढरी ।
पाहता पृथ्वीवरी आणिक नाही ॥१॥
धन्य ते दैवाचे घेती प्रेमसुख ।
सदा नामघोष मुखी वसे ॥२॥
भीमा चंद्रभागा दोहींचा संगम ।
नांदे मेघश्याम पांडुरंग ॥३॥
पुण्य पुष्पावती तीरी वेणुनाद ।
सप्रेम गोविंद क्रीडा करी ॥४॥
बैसोनि विमानी येती देव तिन्ही ।
काळ हा साधुनी माध्यान्निके ॥५॥
ब्रह्मत्रय-क्षेत्र पंढरी-पाटण ।
म्हणोनी श्रेष्ठ जाण बहुता गुणे ॥६॥
कर्मब्रह्म काशी नामब्रह्म पंढरी ।
सर्वब्रह्मगिरी खलुविद ॥७॥
पंढरीमाझारी ब्रह्मत्रयवास ।
म्हणोन विशेष पंढरी हे ॥८॥
बहेणि म्हणे पंढरीं सर्वांही वरिष्ठ ।
ऐशा श्रुती स्पष्ट बोलताती ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग