सप्तपुर्यांमांजी पं
409.
सप्तपुर्यांमांजी पंढरी पावन । नामघोष जाण वैष्णव करिती ॥१॥
देव तो विठ्ठल देव तो विठ्ठल । आहे सोपा बोल वाचे म्हणता ॥२॥
आणिक कांही नको यापरतें साधन । विठ्ठल निधान टाकुनियां ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठला वांचुनी । आन नेणे मनी दुजे कांही ॥४॥
