आरती तुकारामा । स्वा
408.
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।
सच्चिदानंद मूर्ति । पाया दाखवी आम्हा ॥१॥
आरती तुकारामा ॥धृ॥
राघवे सागरांत । पाषाण तारिले ।
तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले ॥२॥
तुकिता तुळनेसी । ब्रम्ह तुकासी आले ।
म्हणोनि रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥३॥
