वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

स्थावर जंगम प्रणव प्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075164 · अभंग क्र. ४०५

405.
स्थावर जंगम प्रणव प्रसवला ।
आत्मा स्वये संचला प्रणवा ठायी ॥१॥
अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता ।
अर्धमातृके परता प्रणवची ॥२॥
ज्ञानदेव म्हणे प्रणवाचे ठायी ।
प्रणवी प्रणव पाही निराळा तो ॥३॥

अर्थ :
प्रणवरुप ब्रह्मापासूनच सर्व स्थावर, जंगम जगत उत्पन्न झाले व आत्माहि प्रणवरुपच आहे. होणाऱ्या भुक्ती मुक्ति या अवस्थाही प्रणवच आहेत. तो प्रणव अर्धमातृकेच्याही पलिकडचा आहे. ते ब्रह्म प्रणवाच्या ठिकाणी साकार स्वरुपांत आहे. आणि निराकार रुपाने प्रणवाहून निराळे आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग