वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

मूळ डाळ बीजी अवघे शा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088463 · अभंग क्र. ४०२

402.
मूळ डाळ बीजी अवघे शाखा पल्लव ।
फळी पुष्पी विस्तारला परि तेचि सर्व ॥१॥
तैसा एक बीजरुप विटेवरी उभा ।
विश्वाकारे प्रगटला व्यापूनिया नभा ॥२॥
सर्वहि होऊनि देवो देवी आपणाचि सकळ ।
भूत व्यक्ति नाना वर्ण सूक्ष्म स्थूळ ॥३॥
निळा म्हणे एकाविण नाही दुसरे ।
एकी एकपणही नुरे सेवटिले मरे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग