प्रणवाचे रुप कोणे दे
402.
प्रणवाचे रुप कोणे देहे देखिले ।
निवृत्तीने दाखविले याच देंही ॥१॥
सकार हकार तूर्या उन्मनी भेद ।
अभेदुनी भेद केले मज ॥२॥
ज्ञानदेव म्हणे प्रणवाची खोली ।
अक्षरींची बोली देह सार ॥३॥
अर्थ :
प्रणवाचे स्वरुप देहधाऱ्याने आपल्या देहांत पाहिले असा कोण आहे? मला मात्र याच देहांत निवृत्तीनाथांनी त्याचे दर्शन घडविले. सोहं शब्दातील सकार, हकार, तूर्या व उन्मनी वगैरे भेदांचा निराळेपणा न मोडता मला त्या सर्वस्थिती अभेदाने अनुभविता आल्या. प्रणवाची सूक्ष्म वर्णन करणारी अक्षरे व ज्याच्या सहाय्याने योगाभ्यास करावयाचा असे शरीर ही सारभूत आहेत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
