अनंत तीर्थांचे माहेर
406.
अनंत तीर्थांचे माहेर|अनंत रूपांचे हे सार|अनंता अनंत अपार| तो हा कटी कर ठेवूनि उभा॥१॥
धन्य धन्य पांडुरंग|सकळ दोषा होय भंग|पूर्वज उद्धरती सांग| पंढरपूर देखिलिया॥२॥
निरा भिवरा पडता दृष्टी|स्नान करिता शुद्ध सृष्टी|अंती तो वैकुंठप्राप्ति|ऐसे परमेष्टि बोलिला॥३॥
तेथे एक शीत दिधल्या अन्न|कोटी कुळांचे होय उद्धरण|कोटि याग केले पूर्ण| ऐसे महिमान ये तीर्थींचे॥४॥
नामा म्हणे धन्य जन्म| जे धरिती पंढरीचा मान|तया अंती पुरुषोत्तम|जीवे भावे न विसंबे॥५॥
