वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अष्टधा प्रकृति तेचि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075850 · अभंग क्र. ४१४

414.
अष्टधा प्रकृति तेचि या गोपिका ।
अष्टभाव देखा गोपाळ हे ॥१॥
क्रीडती गोकुळि सदा या शरीरी ।
स्वानंदे निर्भरी परमानंद ॥२॥
इंद्रियगोधने विषय-तृण चरे ।
दुभती अपारे निजसत्त्वे ॥३॥
गोरसाचे डेरे अख्डं संचले ।
सुखे सुखावले स्वानुभवे ॥४॥
तेणे सुखानंदे नाचती गोपळ ।
करिती गदारोळ गोपिका त्या ॥५॥
बहेणि म्हणे जेथे कृष्णाचा अवतार ।
तेथे व्यभिचार स्वप्नी नाही ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग