वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

अग्नीचे पोटी पुरुष उ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075103 · अभंग क्र. ४०९

409.
अग्नीचे पोटी पुरुष उद्भवला अवचट ।
सत्रावी लपंट निशिदिनी ॥१॥
आधार नाही जेथ निराधार वर्तती ।
निराधार न म्हणती आपणा लागी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दाविले ।
या नयनी पाहिले अविनाश ॥३॥

अर्थ :
योग शास्त्रांत शरीरगत अग्नीपासून एक प्रकारची शक्ती उत्पन्न होऊन तिल कुंडलीनी नाडी जागृत होते. तिच्या योगाने मनुष्याचे मस्तकांत असलेल्या अमृताचा कुंभाला धक्का लागून त्यातून अमृतस्राव होऊ लागतो यालाच सत्रावीचे 'पय 'असे म्हणतात परंतु तेथेच तो पुरुष लुब्ध होऊन जातो. योग साध्य झालेल्या पुरुषाला जमीनीपासून अधांत्री राहाता येते. पण ते योगी स्वतःला निराधार असे समजत नाहीत.
श्रीगुरु निवृत्तीरायांच्या कृपेने मला अविनाशी आत्म्याचे डोळयाने प्रत्यक्ष दर्शन झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग