नृसिंह सरस्वति आरती
414.
नृसिंह सरस्वति आरती १
कृष्णापंचगंगासंगम निजस्थान । चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन ।
तेथे भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरूपे तया दिधले दर्शन ॥१॥
जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता । नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥धृ॥
वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान । मृत ब्राम्हण उठवीला तीर्थ शिंपून ॥
वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन । अंत्यवक्रे वदवी निगमागम पूर्ण ॥जय. ॥२॥
शुक्लाकाष्टी पल्लव दावुनि लवलाही । कुष्ठी ब्राम्हण केला शुद्ध निजदेही ॥
अभिनव महिमा त्याचा वर्णू मी कायी । म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायी ॥जय देव ॥३॥
दिपवाळींचे दिवशी भक्त येउनि । आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणी ॥
आठहि ग्रामी भिक्षा केली तद्दीनी । निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानी ॥जय. ॥४॥
ऐसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले । भक्तवत्सल ऐसे ब्रीद मिरविले ॥
अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले । गंगाधरतनय सदा वंदी पाउले ॥५॥
