वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 2. वारकरी संतांच्या आरत्या

तुकोबारायांची आरती २

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073053 · अभंग क्र. ४१२

412.

तुकोबारायांची आरती २
प्रपंच रचना सर्व ही भोगूनि त्यागिली ।
अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली ।

वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली ।
अहंता ममता दवडूनी निजशांती वरिली ॥१॥
जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा ।
तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ॥धृ॥
हरीभक्तीचा महिमा विशेष वाढविला ।
विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला ।

जगदोद्धारालागी उपाय सुचविला ।
निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥२॥
तेरा दिवस वह्या रक्षूनीया उदकी ।
कोरड्याची काढूनी दाखविल्या शेखी ।

अपार कविता शक्ति मिरवूनी विधी अंकी ।
कीर्तनश्रवणे तुमच्या तरिजे जन लोकी ॥३॥
बाळवेष घेवूनी श्रीहरी भेटला ।
विधीचा जनिता तूचि आठव हा दिधला ।

तेणे ब्रम्हानंदे प्रेमा रूढविला ।
न तुके म्हणूनी तुका नामे गौरविला ॥४॥
प्रयाणकाळी देवे विमान पाठविले ।
कलीच्या काळामाजी अद्भूत वर्तले ।

मानव देह घेऊनी निजधामा गेले ।
निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग