वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

आधी रचिली पंढरी | मग

🙏 4. संत नामदेव · ABH-083003 · अभंग क्र. ४१४

414.
आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेंव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी | धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ| उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी | म्हणूनि अविनाश पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी | ते म्या देखिली पंढरी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग