वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

धन्य पंढरीचे सकळही ज

🙏 4. संत नामदेव · ABH-082964 · अभंग क्र. ४०२

402.
धन्य पंढरीचे सकळही जन|जिही सख्य केले विठ्ठलपायी ॥१॥
विठ्ठल हा ध्यानी विठ्ठल हा मनी|विठ्ठल चिंतनी रात्रंदिवस॥२॥
विठ्ठलेविण जया न गमे एक घडी|सर्वस्वे आवडी विठ्ठलाची॥३॥
विठ्ठलची माता विठ्ठलचि पिता|भगिनी आणि भ्राता विठ्ठल ज्यांचा॥४॥
विठ्ठलचि मित्र विठ्ठलचि पुत्र|विठ्ठल कुळगोत्र केला जिहीं॥५॥
विठ्ठलचि क्रिया विठ्ठलचि कर्म|विठ्ठल सकळ धर्म कुळदैवत ॥६॥
गुज गौप्य जीवीचे विठ्ठला सांगावे|विठ्ठले पुरवावे कोड त्यांचे ॥७॥
सर्वकाळ करणे विठ्ठलाची कथा|विठ्ठल जडला चित्ता जयांचिया ॥८॥
विठ्ठल जागृती स्वप्नी आणि सुषुप्तीं|अखंड वोथरती विठ्ठल विठ्ठल ॥९॥
ऐसा सर्वस्वेंसी विठ्ठल भजतां|सुख आले हाता विठ्ठलाचे॥१०॥
नामा म्हणे त्यांचे चरणरेणु होऊन|जालो मी पावन म्हणे आता|११|

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग