भाळे भोळे नरनारी । य
414.
भाळे भोळे नरनारी । येती प्रती संसत्वरींपंढरीये ॥१॥
करती स्नान वंदिती चरणा । क्षेत्र प्रदक्षिणा करिताती ॥२॥
आळविणे मृदंग मोहरी । गरुड टके शोभती करी ॥३॥
करती आनंदे नामघोष । नाही आंस पायांवीण ॥४॥
एका जनार्दनी कौतुके । नाचतु सुखे भक्तराणा ॥५॥
