वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

चला झडझडा वोसंता हे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076398 · अभंग क्र. ४०६

406.
चला झडझडा वोसंता हे वाट ।
पंढरी मूळपीठ दूरी आहे ॥१॥
सांडा आडकथा वोसंडा मारग ।
वाट पांडुरंग पहातसे ॥२॥
स्वहिताची जया असेल तातडी ।
तेणे घडीने घडी काळ साधा ॥३॥
गेलिया दिवस पडेल अंधारी ।
हे ना तैसी परी थार नाही ॥४॥
पडो देह राहो, धरावा निर्धार ।
पांडुरंगी भाव सांडू नये ॥५॥
बहेणि म्हणे आजी जावे वेळोवेळा ।
तरीच पर्वकाळा साधिजेल ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग