वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जन्मोनिया जोडी जोडिल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076240 · अभंग क्र. ४०३

403.
जन्मोनिया जोडी जोडिली संसारी ।
सापडली तीरी चंद्रभागे ॥१॥
घनःश्याम मूर्ति सावळी डोळस ।
उभी सावकाश विटेवरी ॥२॥
नामरूपातीत चैतन्य शाश्वत ।
आत्मस्वरूपस्थित प्रगटली ॥३॥
वेदा अगोचर श्रुतीहूनी पर ।
निर्गुण निर्विकार पहाते गे ॥४॥
अखंड चिद्घन दिसे सर्वसाक्षी ।
बहेणि तया लक्षी हृदयामाजी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग