वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

काशी हे पंढरी | प्रय

🙏 4. संत नामदेव · ABH-082972 · अभंग क्र. ४१०

410.
काशी हे पंढरी | प्रयाग नीरा नरसिंगपुरी|पिंड ठेवा पुष्पावती संगमपदावरी | पूर्वज होती चतुर्भुज ॥१॥
सकळ तीर्थासक्ष वाराणसी | मध्यानकाळी येती पंढरीसी |ओंवाळिती विठोबासी | विश्वनाथ म्हणोनिया ॥२॥
म्हणऊनि वेगी चला पंढरपुरा | विठोबारायांच्या नगरा |चंद्रभागा सरोवरा | देव कौतुक पाहती॥३॥
वाराणसी मनिकर्णिका| चंद्रभागा पुंडलिका |वाराणसी भागीरथी देखा | पांडुरंगी भीमरथी॥४॥
वाराणसी पंचगंगा| पुष्पावती पांडुरंगा | महापातके जाती भंगा | तुर्थे मस्तकी वंदिल्या ॥५॥
वाराणसी दंडपाणि| क्षेत्रपाळ हे हनुमंत दोन्ही|सकळ तीर्थे विठोबाचे चरणी | काशी होय पंढरी॥६॥
वाराणसी माधवबिन्दू| पांडुरंगी वेणुनादु|पंचक्रोशी तीर्थ उदंडू | पांडुरंगी पद्मतीर्थ ॥७॥
वाराणसी मोक्षपंथा | विठ्ठलाचेनि सायुज्यता | एवढे तीर्थ त्रिभुवनी पाहता | तीर्थ नाही यापरते ॥८|वाराणसी चंद्रमौळी| पांडूरंगी वनमाळी|विश्वनाथ नंदी जवळी| विठोबा जवळी गरुड॥९॥
वाराणसी गौरी खुणा | पांडुरंगी रुक्मिणी जाणा|वाराणसी अन्नपूर्णा | पांडुरंगी जाणा सत्यभामा ॥१०॥
वाराणसी त्रिशुळावरी | सुदर्शनावरी पंढरी |काही संदेह मनी न धरी | काशी होय पंढरी ॥११॥
ऐसे सकळ तीर्थांचे माहेर| तीर्थ नाही यापरते थोर|विष्णुदास नामयाचा दातार| पुंडलिकासहित असे ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग