पंढरीची युगसंख्या
412.
पंढरीची युगसंख्या
कृत त्रेता द्वापार कली |ऐसा चौयुगांचा मेळी |ते महायुग शब्द आढळी| वेदांतशास्त्री ॥१॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांतर |तैसीच रात्र एक सहस्त्र |तीसा दिवसांचा प्रखर | एक मास ॥२॥
ऐसे बारा मास| त्याचे एक वरुष |शतभरी आयुष्य| ब्रह्मयाचे ॥३॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांत | शत वरुषे गणीत|ज्या प्रळयी पोहत| मार्कंडेय उदकी ॥४॥
ऐसु अठ्ठावीस युगे जाण |पंढरपुरासी जाली पूर्ण |जो की ब्रह्मयाचा दिन| प्रलय काळ॥५॥
नामा म्हणे पंढरीची संख्या |सांगीतली संत महंत लोका |लक्षूनि पादुका | विठोबाच्या ॥६॥
