वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सर्वांगव्यापिणी भीमे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076058 · अभंग क्र. ४०७

407.
सर्वांगव्यापिणी भीमेचा महिमा ।
वर्णावया ब्रह्मा अनिर्वाच्य ॥१॥
धन्य ते दैवाचे पंढरीचे लोक ।
घेती प्रेमसुख विठोबाचे ॥२॥
भीमा-चंद्रभागा संगम जे ठायी ।
वानावा वो काई महिमा तेथे ॥३॥
त्याहीवरी जेथे पंढरीचा देव ।
काय सांगो भाव क्षेत्रमहिमा ॥४॥
तिहींचा संगम वसे जये ठायी ।
सांगावा तो काई महिमा त्याचा ॥५॥
एसिया क्षेत्राचा महिमा ऐकता ।
पापाची हे वार्ता स्वप्नीं नाही ॥६॥
स्नानदान घडे देवाचे दर्शन ।
तेथे जन्ममरण काय करी ॥७॥
फिरे सुदर्शन सदा सर्वकाळ ।
काळ आणि वेळ कैची तेथे ॥८॥
स्नानालागी देव येताती मिळोनी ।
बैसोनी विमानी माध्याह्नीके ॥९॥
ऐसा क्षेत्रमहिमा कोण वानी सीमा ।
नकळे अधमा असोनिया ॥१०॥
धन्य पुंडलीक धन्य त्याचा भाव ।
क्षेत्राचा अनुभव वाढविला ॥११॥
बहेणी म्हणे पुण्य पाहिजे ते गाठी ।
व्हावयाते भेटी विठोबाची ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग