वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

निळावर्ण ब्रह्मरंध्र

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075165 · अभंग क्र. ४०७

407.
निळावर्ण ब्रह्मरंध्र येक निके ।
पहा माझे सखे भाविक ॥१॥
उन्मनि सदैव वसे अक्षय पंथे ।
लाऊनिया चित्ते तया गायी ॥२॥
ज्ञानदेव म्हणे यापरती खूण ।
नाही ऐसी आण वाहातसे ॥३॥

अर्थ :
ब्रह्मरंधातील नील बिंदूकडे लक्ष ठेवा. ही जोड उन्मनी अवस्थेत होईल. अक्षयपणे चित्त त्याच्याकडे लावा या पलिकडे या मार्गाची खूण दूसरी नाही असे शपथ घेऊन माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग