स्थूलदेह सूक्ष्म कार
412.
स्थूलदेह सूक्ष्म कारण तिसरा देह ।
चौथा महाकारण देह ऐक बापा ॥१॥
औटपीठाचे दरी कर्पूर वर्णावरी । शामाचे अंतरी महाकारण ॥२॥
महाकारणी आतुला लक्षाचा पुतळा ।
उन्मनी हे कळा दैवी वरी ॥३॥
सहस्रदळ तेंच की आन नाही ऐसे ।
महा तेज वसे ज्याचे आत ॥४॥
पश्चिम मार्ग तेथूनी ऊर्ध्व उंच गगनी ।
जेथे एक कामिनी एकलीच ॥५॥
मार्ग नाही तेथे कोणे रीती जावे ।
सुषुम्नेवरी वळघावे सामर्थ्येसी ॥६॥
तेथुनी ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्रातुल्य ।
त्यांतून उडणे भले चपलत्वेंसी ॥७॥
जडता वळंघिता बरी नारी आपण एक ।
नर नारी नपूंसक एकरुप ॥८॥
ज्ञानदेव म्हणे जो उडुनी जाय तेथ ।
परब्रह्मींची मात तोचि जाणे ॥९॥
अर्थ :
तुला स्थूल, सूक्ष्म, कारण हे देह माहित आहेत आता महाकारण देहाची चार स्थाने आहेत. त्यापैकी औटपीठ हे एक होय. आता महाकारण देह सांगतो ऐक. बाहेरुन पांढरा सूक्ष्म देह, त्याच्या आतून काळा कारण देह व त्याच्या आत महाकारण देह आहे. या महाकारण देहांत योग्याचे लक्षरुप एक तेजस्वी ज्योत आहे. ही दैवी उन्मनी अवस्थेतच दिसते. तेच सहस्रदळ कमळ व त्यातच ती तेजोमय ज्योत असत. तेथून पश्चिम मार्गान म्हणजे विहंगम मार्गाने उंच गेल्यावर एक कामिनी सुषुम्ना नावाची नाडी आहे. तिच्याकडे जाण्याला लवकर रस्ता सापडला नाही. पुढे सामर्थ्यकरुन त्या सुषुम्ना नाडीवर जावे. तेथन पढे मुंगीच्या डोळ्यापेक्षा सूक्ष्म छिद्र आहे. त्यातुन मोठ्या चपळाईने बाहेर पडावे. तेथे पुरुष, स्त्री तान्ही रुपे ज्याला आहेत. असे परमतत्त्व आहे. त्या ठिकाणी ज्याला योगाभ्यासाने उडी मारुन जाता येते. तोच परमतत्वाची खूण समजेल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
