पिकली पंढरी पिटिला ध
408.
पिकली पंढरी पिटिला धांडोरा । केणे आले घरा सभागियांच्या ॥१॥
चंद्रभागे तीरीं उतरले बंदर । आले सवदागर साधुसंत ॥२॥
वैष्णव मिळोनि केला असे सांठा । न घेतो करंटा अभागीया ॥३॥
एका जनार्दनी आले गिर्हाईक । वस्तु अमोलिक सांठविली ॥४॥
