सांडूनि पंढरी जासी आ
409.
सांडूनि पंढरी जासी आणिका तीर्था|लाज तुझ्या चित्ता कैशी नये ॥१॥
त्रिभुवनींची तीर्थे जाली ती मळीन|व्हावया पावन आली येथे ॥२॥
एवढा ब्रह्मानंद कैंचा आणिका ठायीं|जो या आहे पायी विठोबाच्या ॥३॥
काळ मृत्यु दोन्ही घालोनि पायांतळीं|वाजविल्या टाळी कीर्तनसंगे ॥४॥
नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा|भोगिजे अवलीळा संतसंगे ॥५॥
धर्म अर्थ काम मोक्ष मुक्ती चारी|देतो हा मुरारी नामे एका ॥६॥
नामा म्हणे निकी दाखवीलि सोये|न विसंबे मी पाय खेचराचे॥७॥
