वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 137. पंढरी महात्म्य

अवघी हे पंढरी सुखाची

🙏 4. संत नामदेव · ABH-082986 · अभंग क्र. ४०५

405.
अवघी हे पंढरी सुखाची मांदुस |माजी स्वप्रकाशरत्ना हरी ॥१॥
धन्य संतजन तेथिचे पारखी |ज्या जाली ओळखी विठ्ठल रूपी ॥२॥
अनुभवुनी चित्ती पाहिले विवेके |धरिले पुंडलिके ह्रदयकमळी ॥३॥
भक्तीचे खेवण प्रेमाचे कोंदण |करोनि भूषण मिरवीतसे ॥४॥
युगे गेली परी पालटचि नाही|नित्य शुद्ध पाही तेजःपुंज ॥५॥
पाहता नित्य नवे ध्याता चित्त निवे|म्हणोन नामा जिवे न विसंबे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग