काय सांगू तुझी करणी
408.
काय सांगू तुझी करणी नारायणा|वेदपारायणा केशिराजा॥१॥
पृथ्वीवरी तीर्थे आहेत अपार|परी पंढरीची सर एका नाही|२|जन्मो जन्मीचिया पातका दरारा|चुकती येरझारा एके खेपें॥३॥
ब्रह्मज्ञानेंविण मोक्ष आहे भूतीं|वाचेसी ते घेती विठ्ठलनाम॥४॥
बेताळीसांसहित जातील वैकुंठा|नामा म्हणे भेटा विठ्ठलासी॥५॥
